Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra | ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार” – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (Madhya Pradesh OBC Political Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या (Maharashtra OBC Political Reservation) मुद्द्यावर चर्चा होताना दिसत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकातही आरोप प्रत्यारोप होत आहेत. ओबीसींच्या आरक्षणावरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra)

 

अजित पवार म्हणाले, ”राजकारण न करता ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर निर्णय व्हावा. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. एम्पिरिकल डेटा सादर करण्यासाठी समिती नेमली आहे. ओबीसी आरक्षणात राजकारण नको. कुठल्याही परिस्थितीत शेवटपर्यंत ओबीसी समाजाला त्यांचे प्रतिनिधीत्व राहिले पाहिजे यासाठी मनापासून राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे,” ते म्हणाले.

 

”सभागृहात एकमताने ओबीसी आरक्षणावर विधेयके पास झाली, वेगवेगळे विचार आले. राजकारण न आणता पुढे कार्यवाही करावी असे एकमत झाले.
आत्ताच्या निवडणुका मध्य प्रदेशच्या धर्तीवर जो निर्णय झाला तशाच महाराष्ट्रात घ्याव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मतदानाच्या शेवटच्या घडीपर्यंत हे प्रयत्न सुरू राहतील. सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे.
न्याय व्यवस्थेने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. मध्य प्रदेशने जसा इम्पिरिकल डेटा दिला तसा आम्ही पण देऊ
आणि आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतोय,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

Web Title :- will strive to the end for obcs political reservation ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | विधवा प्रथा हद्दपार ! हेरवाड गावच्या ऐतिहासिक ठरावाचे शासन निर्णयात रुपांतर

 

Abbott India | 275 रुपयांचा डिव्हिडंट देत आहे ‘ही’ फार्मा कंपनी, 7000% दिला आहे रिटर्न

 

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

 

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे गेला टाटा ग्रुपचा हा शेअर, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 9.78 लाख रुपये