Ajit Pawar On Pune Kuswali Pathar | पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण होणार जागतिक पर्यटन केंद्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Pune Kuswali Pathar | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणारा पुणे जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि पर्यटनाची ठिकाण आहेत. पुणे शहरात शनिवार वाडा, पर्वती डोंगररांगा आणि सिंहगड किल्ला आहे. तर जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून याठिकाणी पर्यटन वाढीचा प्रयत्न केला जात आहेत. यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि.21) मावळ तालुक्यातील कुसवली पठार हे पर्यटनाचे केंद्र बनवण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. त्यावेळी मावळ येथील कुसवली पठाराला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar On Pune Kuswali Pathar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा, अशा सूचना अजित पवार यांनी या बैठकीत केली. (Ajit Pawar On Pune Kuswali Pathar)

कुसूली येथील जागतिक पर्यटन केंद्रासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने आवश्यक माहिती संकलीत करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल,
असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे उपस्थित होते.

कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर उंचीवर असून साधारण 1 हजार 200 एकरचा हा परिसर आहे.
परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत.
पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद