Ajit Pawar On Sangram Thopte | भोरच्या आमदारांवर अजित पवारांचा हल्लाबोल, भोरचा विकास का झाला नाही. इथले आमदार झोपा काढत होते का?

पुणे : Ajit Pawar On Sangram Thopte | बारामती लोकसभेसाठी (Baramati Lok Sabha) आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून आज अजित पवार यांनी भोरमध्ये शेवटची सभा घेतली (Bhor Sabha). या सभेत अजित पवार यांनी स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले.

भोरच्या विकासकामांचा आणि रखडलेल्या कामांचा पाढा वाचत अजित पवार म्हणाले, भोरच्या आमदारांनी गावासाठी साधी बसव्यवस्था केली नाही आणि अजित पवार पालकमंत्री असताना काय केले, असे विचारतात. ऐकूण घेतो म्हणून काहीही ऐकूण घ्यायला मी काही मोकळा नाही.

अजित पवार म्हणाले, सुनेत्रा पवारांना निवडून द्या. मी तिला म्हणेन बस बाई तू माझी बायको आहे. आपल्याला निवडून दिलंय आपण एकत्र विकास करु, तर ती मला अजिबात नाही म्हणणार नाही. विकास कामे करणार म्हणजे करणार.

अजित पवार म्हणाले, बारामतीचा विकास मी केला आहे. उगाच बारामतीसारखा विकास होत नाही. बारामती, बारामती असे अनेक लोक उगाच बोलत नाहीत. आपले घर बांधतात तसेच विकासकामांवर लक्ष द्यावे लागते. सकाळी ६ वाजता बाहेर पाडतो, काम करतो, सगकीकडे लक्ष देतो. म्हणून विकासकामे चांगली होतात. मग भोरचा विकास का झाला नाही. इथले आमदार झोपा काढत होते का?, असा सवाल पवार यांनी केला.

भोरकरांना विकासाचे आश्वास देताना अजित पवार म्हणाले, केंद्रातील सर्व निधी आपल्याला मिळालाच असे नाही.
मागील १० वर्षात केंद्राच्या विचारांचा खासदार असल्याने निधी फार मिळायचा नाही.
मात्र आता सरकार आपले येणार आहे. त्यामुळे निधीचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
आपला खासदार राहिला की विकास करणे सोपे जाते.

ते पुढे म्हणाले, बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील आपले आहेत.
त्यांच्याशी बोलून चर्चा करुन काम करुन घेणे आता सोपे आहे. मी काम करणारा माणूस आहे.
काम करु दाखवणार म्हणजे दाखवणार.

विकासकामांचे आश्वासन देताना अजित पवार पुढे म्हणाले,
आचारसंहिता संपू द्या काम करू. अनेक कारखाने इथे आणू, उद्योग आणू.
आमदार खासदारांनी, गुंतवणूकदारांशी चर्चा करून अडचणी सोडवायच्या असतात.
तरच विकास होतो. पुण्याच्या जवळ असून देखील दुर्दैवाने भोर, वेल्हा, मुळशीचा विकास झाला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा तोल ढळलाय’ शरद पवारांची थेट टीका

Murlidhar Mohol | कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद,
‘मोदी… मोदी…’ जयघोष !!!

Baramati Lok Sabha | बारामतीसह 11 मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार,
तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान