Sharad Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा तोल ढळलाय’ शरद पवारांची थेट टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आठ महिन्यांपूर्वी उभी फूट पडली. अजित पवार गट 40 आमदारांसह वेगळा झाला. परंतु, अजूनही त्यासंदर्भात अनेक दावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालूच असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बारामतीमधील निवडणुकीच्या (Baramati Lok Sabha) निमित्ताने हे पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये थेट अजित पवारांवर निशाणा साधताना त्यांचा तोल ढळल्याची टीका केली आहे. तसेच अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार शरद पवार यांनी घेतला.

त्यांना कुणामुळे स्थान मिळाले हे…

एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी अजित पवार करत असलेल्या टीकांवर प्रतिक्रिया दिली. भूखंडाचं श्रीखंड किंवा दाऊदशी (Dawood Ibrahim) संबंधांचे आरोप असे मुद्दे अजित पवार सभांमधून मांडत असल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी अजित पवारांचा तोल पूर्णपणे ढळल्याचं विधान केलं. त्यांना जे काही एक स्थान मिळालं, शून्यातून इथपर्यंत, त्यात कुणाचं योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला त्यावर काही बोलायचं नाही, असं शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar On Ajit Pawar)

त्यावेळी हे बोलणारे एकदाही आले नाहीत

लोक असं म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एखादी व्यक्ती या पातळीवर जायला लागली तर त्याच्याबद्दल फारशी चर्चा करु नये आणि त्याला गांभीर्यानेही घेऊ नये. माझ्या बंधूंचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. माझ्या निवडणुकीच्या शेवटच्या काळात ते सतत माझ्यामागे उभे राहिले शिवटपर्यंत.
त्यांच्या अखेरच्या काळातही ते मुंबईला उपचारासांसाठी माझ्याच घरी होते.
त्यावेळी आज जे सांगतात ते एकदाही आले नव्हते.
असं असताना असं काहीतरी बोलणं हे योग्य नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

कुटुंबात तर असं बोलणं अतिशय अयोग्य आहे. पण ज्यांचा तोल ढळतो, तो काहीही बोलतो.
मग त्यांना दाऊदचीही आठवण होते आणि भूखंडाच्या श्रीखंडाचीही आठवण होते.
याचा अर्थ त्यांचा तोल हो पूर्णपणे ढळलेला आहे, असं शरद पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Bhavan | महिला सुरक्षेसाठी मोदी सरकार हटवावेच लागेल; सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांचे मत