Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth | ‘गेलं तर म्हणायचं का गेले आणि नाही गेले तर म्हणायचं हे नास्तिक’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे शुक्रवारी पुण्यात (Pune) होते. त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिर (Dagdusheth Halwai Temple Pune) गणपतीचे दर्शन बाहेरूनच घेतले होते. त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे ते दगडूशेठचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. भिडे वाड्याचीही पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पवारांनी बाहेरूनच गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पवारांनी मांसाहार केल्याने त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

 

अजित पवार म्हणाले, ”कुठेही जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. गेलं तर म्हणायचं का गेले आणि नाही गेले तर म्हणायचं हे नास्तिक आहेत. प्रसारमाध्यांनी हे दाखवायचं बंद केल तर बोलणारेही बंद होतील. असं बोलणाऱ्यांवर तुम्ही बॅन आणला पाहिजे. अजित पवार बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा. मिटकरी तर बाजूलाच राहू द्या. अनेक जण शाकाहार मांसाहार करतात. मांसाहार केलेली व्यक्ती कोणाला काही न बोलता मनात ठेवून दर्शनाला जातात तर काही बोलतात (Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth).

त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या मी केल्या नाहीत.
केवळ मंदिरात माथा टेकला तर खरं दर्शन, पंढरपूरला तर कधीकधी आपण पायरीचे दर्शन घेतो,” असेही ते म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth | ajit pawar clarifies on ncp sharad pawar dagdusheth halvai ganpati darshan from out side why he did not go inside bjp targets him

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा