Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा; खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही

मुंबई : Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी (Sportspeople from Maharashtra) गेल्या वर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. राज्य सरकार (Maharashtra State Govt) राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची सरकारने अवहेलना केली असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt) यांनी केला. तसेच या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt) म्हणाले, महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी 286 पदकांची लयलूट केली आहे. तसेच या वर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकवली आहेत.

गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची
घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी खेळाडूंना कोणत्याही प्रकारची
रोख रक्कम मिळालेली नाही तसेच त्यांचा गौरव सुध्दा करण्यात आलेला नाही.
विजेत्या खेळाडूंना राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेली रोख रक्कम तातडीने देण्यात यावी तसेच
त्यांचा उचित गौरव सुध्दा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Web Title :-  Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | It’s been six months since the government just announced; The glory of the players is not and neither is the prize money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन, जयेश पुजारीच्या नावाने धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, पोलिसांकडून तपास सुरु

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली