Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका, म्हणाले – ‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अतिवृष्टी (Rain) व पुरामुळे (Floods) राज्यात जवळपास 10 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री (CM) व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला पंधरा दिवस झाले तरी विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे (Cabinet Expansion) केवळ दावे करायचे व प्रत्यक्षात हम दो आणि बाकी कुणी नाही, असा राज्याचा कारभार चालवायचा, अशी स्थिती असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली . विदर्भाच्या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी अजित पवार बुधवारी नागपूरात आले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt)

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले तरी अपेक्षित मदत मिळाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही अडकलेला आहे. अस्मानी संकटाच्या स्थितीत इतके मोठे राज्य दोन मंत्र्यांच्या भरवशावर चालवणे शक्य नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून सरकारने अगोदर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अजित पवारांनी केली. (Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt)

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नाही. एकाही जिल्ह्यात पालकमंत्री (Guardian Minister) नाही. त्यामुळे जिल्हापातळीवर निर्णय होत नाही. त्यामुळे मदत मिळणार तरी कशी, असा सवाल अजित पवार यांनी केला. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यासाठी तरी पावसाळी अधिवेशन लगेच घ्यावे, अशी मागणी अजित पवारांनी केली.

 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीवर प्रत्युत्तर देण्यात सत्ताधाऱ्यांना जास्त रस दिसतो आहे.
परंतु त्यांना प्रत्युत्तर देऊन राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही ‘एसडीआरएफ’चे (SDRF) नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दोन ते अडीच पट मदत केली होती.
राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title : – Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | the governance of the state is like hum do and no one else ajit pawar criticized state government over current situation in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा