Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात रिक्षाचा प्रवास आणखी वाढणार? दरवाढीचा पुनर्विचार; जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांना आश्वासन

Pune Rickshaw Fare Increase | will rickshaw travel become more expensive reconsideration of rate hike pune collectors assurance
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rickshaw Fare Increase | सीएनजी दरवाढीचा (CNG Price Hike) थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना बसणार आहे. इंधनातील दरवाढ लक्षात घेता पुणे (Pune City), पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad) आणि जिल्ह्यात रिक्षाच्या भाडेवाढीला (Pune Rickshaw Fare Increase) मंजुरी देण्यात आली. मात्र ही दरवाढ कमी असल्याची टीका रिक्षा संघटनांनी केल्याने दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संघटनांना दिले आहे.

 

दरम्यान, रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने (Rickshaw Panchayat Delegation) बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांची भेट घेतली. भाडे वाढीबाबत बी. सी. खटुआ समितीने (B. C. Khatua Committee) कोष्टक तयार केले आहे. त्यातील सुत्रानूसार नवीन भाडेवाढ झाली नाही, अशी तक्रार केली. या शिष्टमंडळात संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, आनंद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण यांचा समावेश होता.

 

रिक्षा भाडे दरासाठी प्रति किलोमीटर 14 ऐवजी 15 रुपये केले. म्हणजे एक रुपया दरवाढ केली.
पहिल्या दीड किमीच्या टप्प्यासाठी दोन रुपये म्हणजे 21 ऐवजी 23 रुपये,
तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी एक रुपया भाडे वाढ केली. 1 ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.
मात्र ही दरवाढ (Pune Rickshaw Fare Increase) अतिशय तोडकी आहे.
त्यातच सीएनजी मिळण्यासाठी रिक्षा चालकांना काही तास रांगेत घालवावे लागतात, अशी तक्रार करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत सीएनजी पुरवठा कंपनी (CNG Supply Company)
अधिकाऱ्यांची बैठक आज (गुरुवार) तातडीने बोलावली आहे. दरवाढीचा अभ्यास करुन
त्याचाही पुनर्विचार करु असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

 

Web Title :- Pune Rickshaw Fare Increase | will rickshaw travel become more expensive reconsideration of rate hike pune collectors assurance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Yeola Assembly Election 2024 | Sharad Pawar's attack on Bhujbal from Yevla Constituency; Said - 'Bhujbal did not leave limits, his industry affected the government'

Yeola Assembly Election 2024 | येवला मतदारसंघातून शरद पवारांचा भुजबळांवर घणाघात; म्हणाले – ‘भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत, त्यांच्या उद्योगाचा परिणाम सरकारवर झाला’

Bhor Assembly Election 2024 | What kind of accomplished MLA could not build good quality educational institutions while in power? Mahayuti's Shankar Mandekar criticizes Sangram Thopte

Bhor Assembly Election 2024 | सत्ता असताना चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था ही उभारता आल्या नाहीत हे कसले कर्तृत्ववान आमदार? महायुतीच्या शंकर मांडेकरांची संग्राम थोपटेंवर टीका