Ajit Pawar On Supriya Sule | अजित पवारांच नवं संशोधन, सुप्रिया सुळेंवर टीका करताना म्हणाले, ”संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”

पुणे : Ajit Pawar On Supriya Sule | बारामती मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha) अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पवार कुटुंबातील नणंद-भावजयी येथे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. शरद पवार विरूद्ध अजित पवार असा एकप्रकारे हा सामना आहे. प्रचारसभांमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. स्वत: शरद पवार आणि अजित पवार येथे प्रचारासाठी उतरले आहेत. बारामतीत बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईनमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

विशेष म्हणजे, संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत असं वक्तव्य करून अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र, पुढे बोलताना अजित पवार यांनी आपण किती चांगले वक्ते आहोत हे देखील सांगितले. मी भाषणात नंबर एक आहे, माझी पट्टी लागली तर मी सुद्धा चांगलं भाषण करतो, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी म्हटले की, बारामतीमध्ये मतं मागण्याची काहीतरी लेव्हल होती. ही लेव्हल आता सोडायला लागले आहेत. आणि त्यातून लोकांना भावनिक केले जात आहे. त्यातून काही सांगितले जात आहे. नुसते संसदेत भाषणे करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत.

हा अजित पवारही भाषणात नंबर एकचा आहे. माझी पट्टी लागली तर मीही भाषणे करतो.
पण मी भाषणंही करतो आणि कामंही करतो.
मी विकासाला निधीही आणतो आणि एखादं काम वाजवून करून घेतो, असे अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित