Ajit Pawar – Porsche Car Accident Pune | अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न ; ‘ पालकमंत्री कुठे आहेत? विरोधकांची टीका

पुणे : Ajit Pawar – Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथील अपघातानंतर (Kalyani Nagar Accident) विविध स्तरातून रोष व्यक्त झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस आयुक्तालयात उपस्थित रहात पोलिसांना सूचना केल्या. दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र घटना घडून चार दिवस उलटले असेल तरी पुण्यात आले नसल्याची चर्चा सुरू आहे.

अजित पवारांच्या या भूमिकेने ‘ पालकमंत्री कुठे आहेत?’ असा सवाल विरोधक करीत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधला होता तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालयात येऊन प्रत्यक्ष भेट देऊन पोलिसांना सूचना दिल्या होत्या. मात्र या सर्व प्रकारात अजित पवार कुठेच दिसले नाहीत.

कोणतीही घटना घडल्यानंतर अजित पवार दौऱ्यावर असतानाही नेहमी शासकीय यंत्रणेच्या संपर्कात असतात
हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रकरणात त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबतही संपर्क साधला नसल्याची माहिती आहे.
शहरातील या घटनेची पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी दखल घेणे महत्वाचे होते.
मात्र यापासून ते दूर का राहिले याचे स्पष्टीकरण त्यांनी पुढे येऊन देणे आवश्यक आहे. (Ajit Pawar – Porsche Car Accident Pune)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त