Ajit Pawar | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही आमच्याकडेच’, अजित पवारांची स्पष्ट भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ (DyCM Oath) घेतल्याने राजकीय वतर्तुळात खळबळ उडाली. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी 40 हून अधिन आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट (NCP Political Crisis) पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

 

बहुसंख्य आमदार हे आमच्यासोबत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह (Maharashtra NCP Crisis) आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. प्रांताध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची नेमणूक केली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. अजित पवार, प्रफुल्ल पटेल (Praful Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

 

पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर

 

काहींनी आमच्या विरोधात सांगून नोटीस वगैरे काढली आहे तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष (Party) आणि चिन्ह (Party Symbol) आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहील याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही करावाई केली जाऊ शकत नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

 

सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष

 

केंद्र सरकारचा (Central Government) फायदा अर्थात निधी, परवानग्या लागतात. केंद्र सरकार वेगळ्या विचारांचं आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असलं तर निधीच्या बाबतीत कमतरता राहते असंही अजित पवार यांनी म्हटलं. यावेळी सुनील तटकरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष (State President) म्हणून करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

 

शरद पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष

 

शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
सुनील तटकरेंची नियुक्ती प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. मी पण पक्ष स्थापनेपासून भुजबळांच्या नेतृत्वात काम केलं.
काल मला जी माहिती मिळाली त्यात सुनील तटकरेंची नियुक्ती पटेल यांनी केली आहे.
काही मान्यवरांची अशी वक्तव्य आली की आम्ही कायदेशीर मार्गाने न जाता जनतेत जाऊ.
पण रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगितल्या जात आहेत. याला काही अर्थ नाही.
आमची भूमिका योग्य, चांगली आणि राष्ट्रवादीच्या भल्याची असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

Web Title : Ajit Pawar | we are the nationalist congress party we-also have the symbol ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा