अजितदादांचा वर्गमित्र अंडरवर्ल्डमध्ये

ADV

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध असलेले अजितदादा यांचा बारामतीतील हुशार शालेय वर्गमित्र आता अंडरवर्ल्डमध्ये आहे, वाचून आश्चर्य वाटेल ना, पण ही वस्तूस्थिती खुद्द अजित पवार यांनीच स्वत: सांगितली आहे. चांगले मार्क मिळविले म्हणजे हुशार असे काही नाही हे सांगताना अजित पवार म्हणाले की माझ्या शाळेमधील जो पहिला क्रमांक मिळवायचा त्याची आता स्थिती वाईट आहे. तर जो दुसरा क्रमांक मिळवायचा, आमचे नातेवाईक ज्याचे उदाहरण द्यायचे तो आता चक्क अंडरवर्ल्डमध्ये आहे. अजित पवार यांच्या या गौप्यस्फोटाने उपस्थित क्षणभर अवाक झाले. बारामतीमधील अनेकांत एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कुलच्या उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते.

ADV

[amazon_link asins=’B01GA8IN7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4ce87c0-88ab-11e8-ab5b-e52ec84f3aa4′]

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील बीएमसीसी मध्ये शिकत होते. ते राजकारणात मोठे नेते झाल्यानंतर अनेक जण मी त्यांच्या वर्गात होतो, आम्ही एकाच बाकावर बसत असे, असे सांगतात. त्यावर शरद पवार यांनी एकदा अनेक जण आम्ही एकाच बाकावर बसत असल्याचे सांगतात. तो बाका किती मोठा होता हे मलाही पहायचे आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली होती. पण, अजितदादा यांच्या शाळा, कॉलेजमधील वर्गमित्रांविषयी आजवर अशी काही चर्चा झाली नाही.

शाळेतील आठवणींना उजाळा देताना आणि हुशारी मोजण्याच्या आपल्या पद्धतीवर टिप्पणी करताना अजित पवार म्हणाले की, माझ्या शाळेतील सर्वात हुशार व चांगले गुण मिळविणारा विद्यार्थी आता वाईट अवस्थेत आहे. तर जो दुसरा येत असे त्याचा आदर्श घेऊन अभ्यासक करण्याचा सल्ला दिला जायचा तो आता चक्क अंडरवर्ल्डमध्ये आहे. पण त्याचे नाव आपण सांगणार नाही. सध्या दर्जेदार शिक्षण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे खासगीमध्ये संस्थाचालकांना दरोडेखोर, शिक्षकांना चोर असे म्हणतात. एखाद दुसरा संस्थाचालक चुकीचे वागत असेल तर सरसकट सर्वांना त्याप्रमाणे धरणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B079YK3W49′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6f051ea-88ab-11e8-af87-7906deac3d74′]