‘नशेबाजांची जागा समाजात नसून जेलमध्येच’, ‘या’ अकाली नेत्याने बॉलीवूड स्टार्सवर साधला ‘निशाणा’

नवी दिल्ली : करण जोहर आपल्या घरातील पार्टीच्या व्हिडिओमुळे चांगलाच वादात सापडला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक टॉपचे बॉलीवूड स्टार पार्टी करत असताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील अनेक लोकांनी या व्हिडिओतील लोकांची बॉडी लॅग्वेज पाहून ते ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिरोमणि अकाली दल चे नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनीदेखील असाच आरोप केला. या वादात कांग्रेस चे नेते मिलिंद देवरा यांनीदेखील उडी घेतली असून सिरसांना माफी मागण्यास सांगितले आहे परंतु शिरसांनी यास नकार दिला आहे.

आता यासंदर्भात सिरसांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विटर वर हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की,’ जर कोणी मला या नशेबाजांची माफी मागन्यास सांगत असेल तर माझे संपूर्ण आयुष्य जरी जेल मध्ये गेले तरी चालेल परंतु मी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. या जगातील कोणतीही व्यक्ती किंवा ताकद मला माफी मागण्यासाठी सक्ती करू शकत नाही.’

शिरोमणि अकाली दलाचे नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी व्हिडिओतील बॉलीवूड सिताऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दीपिका, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, शाहिद कपूर, जोया अख्तर, अयान मुखर्जी, विकी कौशल, रणबीर कपूर आणि वरूण धवन यांच्यावर ड्रग्स घेतले असल्याचा आरोप केला आहे. तर याला प्रत्युत्तर देताना कांग्रेस नेता मिलिंद देवरा यांनी माझी पत्नी देखील या पार्टीमध्ये उपस्थित होती आणि सिरसा यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असून ते विनाकारण या बॉलीवूड स्टार्स ची बदनामी करत आहेत असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी सिरसा यांना माफीदेखील मागण्यास सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त