Akasa Air | राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीचे पहिले विमान आले, पुढील महिन्यापासून Akasa चे उड्डाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Akasa Air | भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात (Indian Aviation Sector) लवकरच नवीन विमान कंपनी (Airline Company) चा प्रवेश होणार आहे. ही कंपनी दुसरी कोणी नसून राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या गुंतवणुकीची आकासा एअर (Akasa Air) आहे. कंपनीला मंगळवारी पहिल्या विमानाची डिलिव्हरी मिळाली. यासह, कंपनी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक एअर ऑपरेटर परमिट (Air Operator Permit) मिळविण्याच्या जवळ पोहचली आहे.

 

बोईंगकडून 72 विमाने खरेदी करत आहे कंपनी

Akasa Air ने बोईंगच्या 737 मॅक्स एयरक्राफ्ट (737 Max Aircraft) च्या 72 युनिट्सची ऑर्डर दिली आहे. त्याच बॅचच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी कंपनीला मिळाली आहे. 15 जून रोजी अमेरिकेतील सिएटल येथे विमानाच्या सेरेमनियल चाव्या (Ceremonial Keys) कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्या.

आज पहिल्या विमानाचे स्वागत करण्यासाठी कंपनीचे लीडरशीप टीम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) उपस्थित होती. कंपनीने अलीकडेच आपल्या पहिल्या विमानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

सीईओंनी डिलिव्हरीच्या वेळी म्हटले…

कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी पहिले विमान वेळेवर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
ते म्हणाले, पहिल्या विमानाचे आगमन हा आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा प्रसंग आहे आणि हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

देशातील सर्वात ग्रीन, सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारी एअरलाइन बनण्याच्या जवळ आणणारा हा क्षण आहे.
ते म्हणाले की, आकासा एअर हे देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या प्रगतीचे आणि उत्तम स्टार्टअप इकोसिस्टमचे उदाहरण आहे.
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा तर आहेच, पण ती एका नव्या भारताची कहाणीही आहे.

यावेळी बोलताना बोईंग इंडियाचे (Boeing India) अध्यक्ष सलील गुप्ते म्हणाले, आकासा एअर सर्वांसाठी परवडणारा हवाई प्रवासाला सुरुवात करण्याच्या अगदी जवळ आहे.
आकासा एअरचे भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि विमान वाहतूक उद्योगासाठी वाढ आणि उत्पादकतेसाठी अफाट संधी उपलब्ध करून देते.

आम्ही उत्साहित आहोत की अपग्रेड केलेले 737 मॅक्स अकासा एअरच्या ग्राहकांना शानदार उड्डाणाचा अनुभव देऊन बिझनेस एफिशिएन्सी आणि ऑपरेशन्स वाढविण्यात मदत करेल.

 

पुढील महिन्यापासून सुरू होईल संचालन

आकासा एअर या वर्षी जुलैपासून व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहे.
कंपनीला एक ’QP’ कोड देण्यात आला आहे, ज्याची माहिती कंपनीने स्वत: काही दिवसांपूर्वी दिली होती.
त्यानंतर कंपनीने एक चित्र पोस्ट केले होते, ज्यामध्ये लिहिले होते, QP, पार्टी तर नुकतीच सुरू झाली आहे.

यासोबत कंपनीने कॅप्शन दिले होते… एअरलाइन कोड ’QP’ जाहीर करताना अभिमान वाटतो.
आकासा एअरलाइनची उड्डाणे सुरू होण्यास विलंब होऊ शकतो, असे याआधी सांगण्यात आले होते.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच कंपनीला सरकारकडून एनओसी मिळाली होती.

 

Web Title :- Akasa Air | rakesh jhunjhunwala akasa airline first aircraft boeing 737 delivery operation from next month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा