Narayan Rane | ‘शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता’ – नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | राज्यातील विधान परिषदेच्या निकालात (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) भाजपने (BJP) बाजी मारली आहे. काँग्रेसच्या (Congress) एका उमेदवाराच्या पराभवामुळे राजकीय नाट्य उफाळलं आहे. शिवसेना (Shivasena) आणि काँग्रेसची मत फुटल्याने सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तसेच दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. ते सध्या जवळपास 25 आमदारासोबत गुजरात मध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

 

“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, नाही तर लवकरच तुझाही आनंद दिघे झाला असता,” असं ट्विट करत उपरोधिक टोला नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेला लगावला आहे. दरम्यान, ठाकरे आणि राणे यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर आले आहेत. परंतु, आता या राजकीय घडामोडीतील वादात राणेंनी उडी घेतल्याने पुढील राजकीय खेळी काय असणार आहे यावर चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल असल्याने राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर राज्यातील मोठ्या घडामोडींवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक सुरू आहे.

 

Web Title :- Narayan Rane | BJP leader and union minister narayan rane criticize shivsena appreciate eknath shinde says otherwise your condition is anand dighe

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा