Akash Thosar | आकाश ठोसर रमला शेतीकामात; ट्रॅक्टरने केली शेतीची मशागत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) हा नेहमीच चर्चेच्या केंद्रभागी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आकाशचा (Akash Thosar) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शेतात ट्रॅक्टर (Tractor) चालवताना दिसत आहे.
सैराट (Sairat) चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू आणि आकाश रातोरात महाराष्ट्राचे सुपरस्टार झाले. आजही त्यांची किमया कमी झालेली नाही. चाहते आजही रिंकू आणि आकाशला तेवढेच प्रेम देतात व त्यांच्या व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होत असतात.
आकाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram Account) ही ट्रॅक्टर चालवतानाची व्हिडीओ शेअर करत ‘नाद’, असे कॅप्शन लिहिले आहे. चंदेरी दुनियेतून बाहेर येत पुन्हा गावाच्या मातीची ओढ या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्याच्या या नम्र स्वभावाचा आणि शेतीतील कामाच्या व्हिडीओमुळे आकाशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कमेंट्स बॉक्समध्ये त्यांचे चाहते हे प्रेम व्यक्त करत आहेत.
सैराट चित्रपटात आर्चा फेम रिंकूने (Rinku Rajguru) ट्रॅक्टर चालवला आहे तर खऱ्या आयुष्यात आकाश
(Akash Thosar) काळ्या आईची मशागत करताना दिसत आहे.
तो सध्या गावाकडे उन्हाळी सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच्या सोशल मिडीयावरून (Social Media)
तो फोटो शेअरकरत असतो. नुकताच त्याचा ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपट (Movie) प्रर्दशित झाला,
त्यानंतर तो आता शेतीकाम करताना दिसत आहे.
Web Title : Akash Thosar | Aakash Tosar Ramla in agriculture; Farming done by tractor
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा