Sameer Wankhede | समीर वानखेडेंना उच्चन्यायालयाचा दिलासा, ‘या’ दोन अटींवर अटक न करण्याचे CBI ला निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भ्रष्टाचार प्रकरणी एनसीबीचे (NCB) माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. वानखेडे यांना 22 तारखेपर्यंत अटक (Arrest) करु नये असे निर्देश न्यायालयाने दिले होते. ही मुदत आज संपत असल्याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अटकेबाबत उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देत मोठा दिलासा दिला आहे. मात्र आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटी घातल्या आहेत.
समीर वानखेडे यांनी संबंधित प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये. प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही, सीबीआयच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही आणि सीबीआय अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहीन, अशी लेखी हमी संध्याकाळपर्यंत देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या सुटीकालीन खंडपीठाने दिले आहेत.
Order
Matter on June 8. CBI to file a reply by 3rd. Protection granted on May 19 to continue subject to following conditions. #BombayHighCourt #SameerWankhede#CBI #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) May 22, 2023
काय आहे प्रकरण?
एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर (International Cruise Terminal)
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 13 ग्रॅम कोकेन,
21 ग्रॅम चरस, एमडीएमच्या 22 गोळ्या आणि 1 लाख 33 हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.
यावेळी एनसीबीने या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी (Aryan Khan Drugs Case)
ताब्यात घेतले. यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींवर एनसीबीने अमली पदार्थ कायद्यानुसार (Narcotics Act) गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
या प्रकरणात आर्यन खान याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकारी आणि या प्रकरणातला स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी (KP Gosavi) यांच्यावर करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये या सर्वांची नावे आहेत. यानंतर एनसीबीने एसआयटीची (SIT) स्थापना केली. एसआयटी चौकशीत वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. यानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली.
Web Title : Sameer Wankhede | mumbai high court relief sameer wankhede no arrest 8 june over cbi register case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा