Maharashtra Politics News | ‘…त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे, बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) कितीही राष्ट्रीय पक्ष असला तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांनी कधीच त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जाऊन युतीची बोलणी केली नाही. कधीही आयुष्यात असे झाले नाही. परंतु हे कटोरा घेऊन दुसऱ्याच्या दारावर जात आहेत आणि बाळासाहेब यांच नाव घेतात. त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे. बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?,अशा शब्दात शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिरसाट बोलत होते.

शिरसाट पुढे म्हणाले, स्वाभिमान हे सर्वात आधी बाळासाहेबांचं बोलणं होते. माझा शिवसैनिक स्वाभिमानी असला पाहिजे असे म्हणायचे. उपाशी पोटी असला तरी शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी म्हणायचा. मात्र आता हे लोक जय शरद पवार आणि जय राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. आम्हाला शिवसेना (Shivsena) शिकवता का? अशा नालायक लोकांमुळेच उद्धव ठाकरे गटाचे हे हाल झाल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली.

शक्तिप्रदर्शन करण्याचा नवा पॅटर्न

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जयंत पाटील आज मुंबईत ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. जयंत पाटील यांची ईडीकडून आज चौकशी (Jayant Patil ED Inquiry) होत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्याभरातून राष्ट्रवादीचे कार्य़क्रते मुंबईत दाखल झाले. कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) आणि ईडीविरोधात ठिय्या आंदोलन केले. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न आज पाहायला मिळत आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.

तर संजय राऊत आतमध्ये दिसले असते

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, ईडीची नोटीस हा काही नवीन भाग नाही, राज ठाकरे (Raj Thackeray),
शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील नोटीस आली आहे.
ते नोटीसला उत्तर देण्यासाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
ईडीचा वापर केला असता तर अनेक लोक तुरुंगात भेटले असते.
ईडी आमच्या इच्छेप्रमाणे वागली असती तर आता संजय राऊत हे अंडासेलमध्ये असते, असे शिरसाट म्हणाले.

राऊतांना नोटा मोजायला बसवणार

ज्यांनी दोन हजारांच्या नोटा दाबून ठेवल्या आहेत, कोट्यवधी रुपयांच्या नोटा मार्केटमध्ये दिसत नाहीत.
त्यामुळे या नोटा कोणाच्या तरी घरी आहेत. तर आमच्याकडे नोटा आहेत म्हणतात.
आता त्या नोटा मोजायला आम्ही संजय राऊत यांना बोलवणार आहोत.
या मूर्ख माणसाला हे देखील माहित नाही की, त्यांना जे 10 लाख दिले आहेत त्या दोन हजारांच्या नोटा आहेत.
त्यामुळे त्या नोटा त्यांनी परत कराव्यात असे शिरसाट म्हणाले.

Web Title :  Maharashtra Politics News | ‘…therefore he should be killed in pairs, did Balasaheb teach you this?’, Shinde group MLA attacked Uddhav Thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shasan Aplya Dari | शासन पहिल्यांदाच पाहिलं…..! लाभार्थींची बोलकी प्रतिक्रिया; शासन आपल्या दारीला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड

Sanjay Shirsat | …तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते, संजय शिरसाट यांचे खळबळजनक विधान

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष’, माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले