Sharad Pawar Gulabrao Patil | ज्यांना कंटाळून उद्धव ठाकरेंना सोडलं, त्यांच्यासोबत रेल्वेने एकत्र प्रवास; शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात काय झाली चर्चा?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar Gulabrao Patil | राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिवसेना (Shiv Sena)-भाजपमध्ये (BJP) कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अशातच आजे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख शरद पवार यांनी एकत्र रेल्वेतून प्रवास केला. (Sharad Pawar Gulabrao Patil) या दोघांच्या एकत्रित प्रवासाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Gulabrao Patil) हे शुक्रवारी (दि. 16) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळेचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी शरद पवार हे एक दिवसीय शिबीरास मार्गदर्शन करणार आहेत.

 

या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत बसले. या दरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करताना पाहून आनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांचा संदर्भात चर्चा झाल्याचे समजत असून दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, त्यांच्यामध्ये नेमकी राजकीय चर्चा काय झाली हे समजू शकले नाही.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका करत आहेत.
शिवसेना ही राष्ट्रवीदी काँग्रेस पक्षासोबत गेल्यानेच अनेक जण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांना सोडून बाहेर पडल्याचं शिंदे गटातील आमदारांनी भाषणांमधून ठिकठिकाणी जाहीरपणे सांगितलं आहे.
ज्या पक्षावर सातत्याने टीका करतात, त्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Web Title :  Sharad Pawar Gulabrao Patil | jalgaon sharad pawar gulabrao patil travel together in railway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा