‘या’ कारणामुळं अकोला पश्चिमची जागा सोडली होती, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला गौप्यस्फोट

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्याच्या अंतर्गत त्यांचा ता.७ रविवारी अकोला दौरा होता. त्यावेळी त्यानी अकोला महानगर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. मागील विधाानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते विजय देशमुख यांनी निवडणुक न लढविण्याचा निर्णय पक्षाला कळविला हाेता. आकाेला पश्चिम मतदारसंघात आपल्या पक्षाचा शक्तिपात झाला असावा असा समज आमचा झाला. त्यामुळेच अकाेला पश्चिम मतदारसंघाची जागा मित्रपक्षाला साेडली व आम्ही बाळापूरची उमेदवारी घेतली. असे भाष्य जयंत पाटील यांनी केले.

जयंत पाटील यांनी विजय देशमुखांची पाठराखण करतानाच गेल्या निवडणुकीत मतदारसंघ बदला मागील सत्य उघड केले. ते म्हणाले की, अकाेल्यात राष्ट्रवादीची ताकद आहे मात्र मध्यंतरीच्या काळात पक्षाच्या कार्यक्रमांना गर्दीच दिसत नव्हती. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम मतांवर झाला. त्यामुळे आता शरद पवार यांच्याशी चर्चा करून नवीन नेतृत्व अकाेला महानगरासाठी दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन नव्या दमाने काम करणाऱ्या युवकांची फळी तयार करा अशी सूचना महानगरध्यक्ष विजय देशमुख यांना केली.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत काय झाले हे आता विसरा ते उगाळत बसू नका. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला विजय देशमुख यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तर अन्न औषध प्रशासन मंत्री डाॅ राजेंद्र शिंगणे म्हणाले, पदाधिकाऱ्यांनाे लवकर उठण्याचा आदर्श घ्या शरद पवार जयंत पाटील हे रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे महानगर अध्यक्षांसह सर्वच पदाधिाकाऱ्यांनी नेत्याचा आदर्श समाेर ठेवत लवकर उठावे व जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकचा वेळ द्यावा, असे ते म्हणाले.