Pune Crime News | पुण्यात एकतर्फी प्रेमातून 37 वर्षीय महिलेवर खुनी हल्ला ! कोरेगाव पार्क परिसरातील बर्निंग घाट येथील घटना

केपी पोलिसांकडून 'मजनू'ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेम (One Sided Love) करणार्‍या मजनुने तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत तिच्यावर प्राणघातक हल्ला (Attempt To Murder) केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) या मजनुला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

संकेत शहाजी म्हस्के Sanket Shahaji Mhaske (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे त्याचे नाव आहे. याबाबत येरवडा येथील ३७ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (KP Police Station Pune) फिर्याद (गु. रजि. नं. ११२/२३) दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट (Burning Ghat Road Koregaon Park) येथे बुधवारी सकाळी सात वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खराडी (Kharadi) येथे नोकरी करतात. त्यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी त्यांची भेट होऊन ओळख झाली होती. त्याच्याबरोबर आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता. संकेत म्हस्के याने एक महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून फिर्यादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मी तुझी फक्त मैत्रिण राहु शकते, असे सांगितले होते. त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले.

 

फिर्यादी या बुधवारी सकाळी सात वाजता बर्निग घाट येथे एका मित्राकडे आल्या होत्या. त्यावेळी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले. तू मला भेटत का नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. त्या खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला. फिर्यादी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक वराळे अधिक तपास करीत आहेत.

कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी संकेत शहाजी म्हस्केला अटक केली आहे.
घटनास्थळी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त एन.आर. राजे (ACP N.R. Raje),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा पवार (Sr PI Neelima Pawar) यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Murderous attack on 37-year-old woman due to
one sided love in Pune! Incident at Burning Ghat Road Koregaon Park area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा