India Rain Update | पावसामुळे उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; पूरस्थिती पाहता सरकार ‘अलर्ट’

नवी दिल्ली : India Rain Update | अनेक दिवसांपासून उत्तर भारतात (India Rain Update) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आल्याने येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), दिल्ली (Delhi) उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) जोरदार तडाखा बसला आहे. दरम्यान, या पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. 16 लोक बेपत्ता (Missing) असून 100 जण जखमी (Injured) आहेत.

 

हिमाचल प्रदेशच्या चंद्रतालमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी पाऊस (India Rain Update) सुरु आहे. उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपत्ती निवारण्यासाठी उत्तराखंड राज्याला केंद्राकडून (Central Government) 413 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) थांबवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनी भाविकांना हवामान स्वच्छ झाल्यानंतरच येण्याचा सल्ला दिला.

 

188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा

दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा (Flooding) बसला असून मोठे नुकसान झाले आहे.

 

यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ

दिल्लीत यमुनेच्या (Yamuna) पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुराचा धोका (Risk of Flooding) निर्माण झाला. तब्बल 45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली. यापूर्वी 9 जून 1978 रोजी यमुना नदीची जलपातळी 207.49 इतकी नोंदवण्यात आली होती.

 

पंजाबमधील 13 जिल्ह्यांना पुराचा फटका

पंजाबमधील (Punjab) 13 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून 479 गावे बाधित झाली आहेत.
पाकिस्तानचे धरण फुटल्याने भारताच्या सीमा भागात पाणी शिरले आहे. दरम्यान, आज संपूर्ण पंजाबमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

Web Title :  India Rain Update | heavy rains cause heavy damage in north india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident News | गिरवली येथे भीमाशंकर-कल्याण बसला अपघात; पाच प्रवासी जखमी

Maharashtra Cabinet Expansion | मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर; खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली?