Akshay Kumar | अक्षय कुमारच्या मुलानंतर आता लेकीचा व्हिडिओ व्हायरल; आईसोबत केला रिक्षातून प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Akshay Kumar | सध्या स्टार किड्सची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कलाकारांसोबतच त्यांची मुले देखील आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. नुकताच अभिनेता अक्षय कुमारच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. मुंबई एअरपोर्टवर आरवला पाहिले गेले होते. पहिल्यांदाच पापाराझींनी त्याचे व्हिडिओ काढून अपलोड केले. आरवचा हा व्हिडिओ क्षणार्धातच सोशल मीडियावर वायरल झाला होता. आता अक्षयच्या मुलानंतर त्याच्या मुलीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापाराझींनी काढलेल्या या व्हिडिओत अक्षयच्या मुलीचा चेहरा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. (Akshay Kumar)

 

आजपर्यंत ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारने आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर अशा पद्धतीने शेअर केले होते ज्यात तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. मात्र आता पापाराझींनी काढलेल्या या व्हिडिओत निताराचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. रविवारी ट्विंकल आणि नितारा ऑटोरिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेत बाहेर पडले असता पापाराझींनी हा व्हिडिओ शूट करून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Akshay Kumar)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की ट्विंकलने मल्टी कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तर निताराने जांभळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहे. यावेळी हे दोघेही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ट्विंकल खन्ना 2001 मध्ये अभिनयापासून लांब जाऊन लेखनाकडे वळाली आहे. तीने अनेक पुस्तकं लिहिली असून एका वर्तमानपत्रात देखील लेख लिहीत आहे. अक्षय कुमारचा नुकताच ‘रामसेतू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत जॅकलीन फर्नांडिस देखील दिसली होती. तर आता लवकरच अक्षयचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

 

Web Title :- Akshay Kumar | twinkle khanna takes auto ride with daughter nitara paparazzi clicks pics watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक