
NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापसून जातीयवादाच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रत्यत्तर दिले आहे. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नसल्याचे शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे नेतृत्व कोणत्या नेत्यांकडे होते, हे पहावे. सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पक्षाचं नेतृत्व केलं. त्यानंतर विविध समाजातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले. मुळात आमच्या मनात जातीपातीचा विचार येतच नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहोत. त्यामुळे आम्ही राज ठाकरे यांच्या टीकेची फारशी दखल घेत नाही. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे कसे उत्तर देतात हे पहावे लागेल. राज ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत देऊ शकतात.
अमित शाहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी गुवाहाटी येथे बोलताना 1 जानेवारी 2024 पर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होईल अशी घोषणा केली आहे. यावर शरद पवार यांनी अमित शाह यांना टोला लगावला. राम मंदिराचे (Ram Mandir) काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. मात्र, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अमित शाह यांनी ही घोषणा केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar taunt mns supremo raj thackeray in kolhapur press conference
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…