Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या (Suicide In Pune) केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) प्रियकराला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

विक्रांत दशरथ जगताप (वय ३८, रा. उरुळी कांचन) असे या प्रियकराचे नाव आहे. ही घटना हांडेवाडी व मांजरी दरम्यान रेल्वे मार्गावर १४ जुलै २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशिल डमरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२/२३) दिली आहे. तारामती अशोक सूर्यवंशी (वय ३८, रा. सय्यदनगर, मुळ परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी ते हांडेवाडी दरम्यान रेल्वे मार्गावर एक महिला जखमी अवस्थेत आढळून आली होती.
तिला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
याबाबत तिच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केली.
त्यात तारामती सूर्यवंशी ही विवाहानंतर २०१६ पासून पतीला सोडून विक्रांत जगताप याच्यासोबत रहात होती.
तारमती हिस विक्रांत मारहाण करत असे. तिला मानसिक त्रास देत होता. तिला जेवायला देत नव्हता.
यापूर्वी तारामती हिने विक्रांत जगताप याच्या अ‍ॅटो रिक्षामधून उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला होता.
डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार विक्रांत जगताप याच्या त्रासाला कंटाळून तारामती हिने रेल्वेखाली उडी मारुन जीव दिल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विक्रांत जगताप याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Tired of her lover’s troubles, married woman commits suicide by jumping under the train; Hadapsar police arrested the boyfriend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पर्स चोरीला गेल्याचा संशय? मुलाने टाकलेली पर्स पोलिसांनी काढली शोधून, जाणून घ्या नेमकं काय झालं

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले-‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढण्यास…’ (व्हिडिओ)