Akshaya Gurav | अभिनेत्री अक्षया गुरवच्या ‘त्या’ फोटोमुळे चाहते नाराज; दिल्या संतप्त प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोटा पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरवने (Akshaya Gurav) प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. अक्षयाने (Akshaya Gurav) नुकतेच तिचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यावरून सध्या नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

 

अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटोज व्हिडिओज इंस्टाग्राम वर नेहमी शेअर करत असते. नुकताच अक्षयाने काही बोल्ड (Bold Photos) फोटोज तिच्या Instagram अकाउंट वर शेअर केले आहे. ज्यामध्ये तीने पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे तर मेसी बन आणि साजेल असा मेकअप तिने केला आहे. अक्षया या फोटोमध्ये शर्टचे बटन उघडे ठेवून फोटोशूट केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

मराठमोळ्या अक्षयाने (Akshaya Gurav) अशा पद्धतीचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट (Hot Photos) केल्यामुळे तिच्यावर चाहते नाराज असल्याचे दिसत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांची नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकारांना काम मिळत नाही तेव्हा ते अशा पद्धतीचे फोटोज काढतात आणि चर्चेत येण्याचा आणि काम मिळवण्याचा प्रयत्न करतात”. तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले “शरीर प्रदर्शन ही एक फॅशन नसून विकृती आहे. ज्यामध्ये तू देखील योगदान दिले आहेस. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे”. तर काहींनी अक्षयाला कमेंट करत अनफॉलो करणार असल्याचेही सांगितले आहे.

 

Web Title :- Akshaya Gurav | marathi actress akshaya gurav troll for bold photoshoot netizens react

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा