सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आळंदी बंद

आळंदी : पोलीसनामा  ऑनलाईन 

आरक्षणाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, संपूर्ण खेड तालुका मराठा आरक्षणासाठी बंद चे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आळंदी देवाची येथे सकल मराठा क्रांती तर्फे आज दि. ३० जुलै रोजी बंद पुकारण्यात आला.
[amazon_link asins=’B06X41T82Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c951d08c-93c6-11e8-90aa-11a5aef9ecef’]

संपूर्ण राज्यात मागिल काही दिवसांपासून सकल मराठा समाजाकडून आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे नाव बदलून आता मराठा क्रांती ठोक मोर्चा झाले आहे. शांततेत आंदोलन करुन प्रश्न सुटत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून विविध ठिकाणी हिंसाचार होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आळंदीत सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शांततेत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एक मराठा लाख मराठा या घोषणांसह मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही घोषणा दिल्या.

यावेळी डी.डी भोसले पाटील (मा. नगरसेवक तथा विरोधीपक्षनेते आ.न.प), प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे (नगरसेवक, आ.न.पा), उत्तम उगले (शिवसेना नेते), आनंदराव मुंगसे (मा. नगरसेवक आ.न.पा), योगेश दिघे (अध्यक्ष, व्यापारी तरुण मंडळ), संदीप नाईकरे (ग्रुप अॅडमीन), माऊली कुऱ्हाडे (उद्योगपती), विलास कुऱ्हाडे (उद्योजक), माऊली गुळुंजकर (मा.अध्यक्ष, व्यापारी तरुण मंडळ), लखन घाडगे (सामाजिक कार्यकर्ते), भागवत शेजवळ यांच्यासह हजारो मोर्चेकरी तसेच आळंदीतील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनीही मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या मोर्चाची सुरुवात चाकण चौक आळंदी येथून झाली. तसेच मरीआई चौक(मरकळ रोड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच मोर्चेकऱ्यांकडून आळंदीतील सर्व दुकाणदारांना संपूर्ण दिवसभर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.