सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशामध्ये जसा कोरोनाचा धोखा वाढत आहे. तसेच फसवणुकीच्या घटनेतसुद्धा वाढ होत आहे. यामध्ये बँकिंग फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी करण्यात येतो. गृहमंत्रालयाकडून या संदर्भात माहिती दिली आहे. सरकारने सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सावधान करण्यात आले आहे.

मंत्रालयाकडून लोकांना इशारा देण्यात आला आहे, कि कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तसेच तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहे. या कारणामुळे सरकार आणि बँकांनी लोकांना याबद्दल जागरुक करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र तरीसुद्धा या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगारांकडून लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्यात येत आहे. ते तुम्हाला मेल वर काही लिंक पाठवतात त्यावर तुम्ही जर चुकून क्लिक केले तर हॅकर तुमची संपूर्ण माहिती चोरू शकतो. त्यामुळे सावधान म्हणून अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

जर तुम्ही या लिंक वर क्लिक केले तर तुमची सगळी माहिती त्या हॅकरला भेटते. गृहमंत्रालयाकडून सायबर दोस्त या हँडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये या मेसेजचं स्वरुपही दाखवण्यात आले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर लगेचच सायबर क्राईम पोलिसांकडे याबद्दलची तक्रार करा. तसेच त्या मेसेजसोबत जी लिंक दिली आहे त्यावर चुकूनसुद्धा क्लिक करू नका. सरकारकडून वेळोवेळी फेक मेसजबद्दलचा अलर्ट जारी करण्यात येतो. तसेच या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कधीच अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि हे मेसेज फॉरवर्डसुद्धा करू नका.

तसेच आता व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित नवनवीन माहिती समोर येत आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनकडून सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावा नाहीतर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हॅकर्सने व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधून काढला आहे. ज्याद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. या नंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप चालू करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने हॅकिंग पासून वाचण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन ही सेटिंग करून घ्यावी. या सेटिंगमध्ये सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. यामुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना हा कोड असणे आवश्यक आहे.