नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं मागितली ‘एवढया’ कोटींची पोटगी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि पत्नी आलिया सिद्दिकी गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीने आलियाने इमेलद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे. 10 वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर वैवाहित जीवनातील चढाओढींमुळे तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर सध्या नवाजुद्दीन आणि आलियाचीच चर्चा सुरु असून आता आलियाने घटस्फोट घेण्यापूर्वी काही अटी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. यात तिने पोटगीमध्ये 30 कोटींची रक्कम मागितली आहे.

आलियाने नवाजुद्दीनकडे दोन्ही मुलांचा ताबा आणि भलीमोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली आहे. आलियाने नवाजुद्दीनला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत समोर आली असून यात तिने काही मागण्या केल्या आहेत. आलियाने पोटगी म्हणून नवाजुद्दीनकडे 30 कोटी रुपये, यारी रोड येथे 4 बीएचके फ्लॅट आणि कायमस्वरुपी स्वत:च्या आणि मुलांच्या खर्चासाठी 10 कोटी रुपये मागितले आहेत.

तसंच मुलांच्या संगोपनासाठी 10-10 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीनने देखील तिच्या या अटी मान्य केल्याचे बोलेले जात आहे. आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अद्याप नवाजुद्दीनने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लॉकडाउन असल्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे नोटीस पाठवल्याचे आलियाच्या वकिलांनी सांगितले आहे.