Alia Bhatt | आलियाने शेअर केला बाळाचा फोटो?; अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या मुलीचे नाव देखील हटके ठेवले आहे. त्यांच्या मुलीचे नाव सर्वत्र चर्चेत असताना तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. राहा असे आलिया आणि रणबीरच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. आलियाने (Alia Bhatt) सोशल मीडियावर काही बाळांचे फोटो शेअर केले आहेत. आता या फोटोजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट देखील केले आहेत.

https://www.instagram.com/p/CotjbVnLY16/?utm_source=ig_web_copy_link

आलियाने एका बेबी वेअर फॅशन ब्रॉडचा प्रमोशनसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने काही बाळांचे फोटो शेअर केले आहेत. आता आलियाने शेअर केलेल्या या फोटोजनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर अनेकांना या फोटोमधील बाळ राहा आहे का असा प्रश्न देखील पडला आहे. आलियाने शेअर केलेल्या या बाळाच्या फोटोला आतापर्यंत 383K लाइक्स मिळाले आहेत. तर दुसऱ्या फोटोला 110K लाईक्स मिळाले आहेत. तर एका नेटकऱ्याने पोस्टवर कमेंट करत म्हटले की “मला वाटलं ही राहा आहे”. तर दुसऱ्याने म्हटले की “ही तुझी मुलगी आहे का?” अशा एक ना अनेक कमेंट सध्या या फोटोवर पाहायला मिळत आहेत. तर या फोटोवर लाईकचा वर्षाव देखील सुरू आहे.

https://www.instagram.com/p/CotjhLTLdI6/?utm_source=ig_web_copy_link

5 वर्ष रणबीर आणि आलिया (Alia Bhatt) हे एकमेकांना डेट करत होते. अखेर 14 एप्रिल 2022 रोजी ते लग्न बंधनात अडकले.
आलियाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर या चित्रपटात आलिया सोबत रणबीर सिंह आणि धर्मेंद्र हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
एवढेच नाही तर आलिया हॉलीवुड मध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमातून पदार्पण करणार आहे.

 

Web Title : – Alia Bhatt | alia bhatt revealed daughter raha kapoor face see report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)