‘हे’ काम करणारी पहिली अभिनेत्री बनली आलिया भट !

मुंबई : वृत्तसंस्था – ‘स्टुडंट ऑफ द इअर’द्वारे पदार्पणात आपले वेगळेपण दाखविणारी अभिनेत्री आलिया भट स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु करणारी बॉलिवूडमधील पहिली कलाकार ठरली आहे. हायवे, उडता पंजाब, राझी सारख्या अनेक चित्रपटांमधून तिचे अभिनयगुण दिसले होते. आता तिने आपल्या चाहत्यांसाठी अन्य कलाकारांपेक्षा वेगळे पाऊल पुढे टाकले आहे.

नुकतेच तिने आपले यू ट्यूब चॅनेल ‘आलियाबे’ लाँच केले. पहिल्याच दिवशी या चॅनेलला ८७ हजारांपेक्षा अधिक लोकांनी सब्सक्राईब केले असून २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती आपल्या चित्रपटांच्या शूटिंगवेळी झालेल्या गंमती-जमती, ‘बिहाईंड द सीन’ दृश्ये आणि आपल्या मेहनतीचे व्हिडीओ शेअर करणार आहे. विशेष म्हणजे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु करणारी आलिया बॉलिवूडमधील पहिली कलाकार ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ? 

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे