Alka Kubal | अलका कुबलने धाकट्या लेकीसाठी केलेली ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या – ‘आज पासून Dr. Kasturee…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alka Kubal | ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल – आठल्ये यांनी आजवर आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यावर त्याचबरोबर मोठ्या पडद्यावर देखील स्वतःचे नाव कमावले आहे. सोशिक आणि आदर्श सुनेची प्रतिमा त्यांनी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे. तर आता त्यांच्याप्रमाणे त्यांच्या लेकी सुद्धा चांगलीच कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. यांच्या दोन्ही मुली आपल्या क्षेत्रात उत्तम काम करत स्वतःचे नाव मोठे करताना दिसत आहेत. अभिनेत्री अलका कुबल यांना दोन मुली आहेत. ईशानी आठल्ये ही पायलेट झाली आहे तर कस्तुरीनं देखील आपल्या क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकत नाव कमावले आहे. नुकतीच अलका कुबल यांनी लेकी बाबत एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Alka Kubal)

 

अलका कुबल नेहमीच आपल्या लेकींचे कौतुक करताना दिसतात. ईशानी आठल्ये पायलेट झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचे भरभरून कौतुक केले होते. आता देखील त्यांनी कस्तुरीने केलेल्या कामगिरीबद्दल इंस्टाग्राम वर पोस्ट करून तिचे कौतुक केले आहे. अलका कुबल यांची लहान मुलगी कस्तुरी ही आपल्या क्षेत्रात चांगलेच यश संपादन केले आहे. कस्तुरी परदेशात शिकत होती तिला डर्मिटोलॉजिस्ट व्हायचे होते. त्यामुळे तिने परदेशातून एमबीबीएस चे शिक्षण घेतले आणि आता तिला नुकतीच डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. याबद्दल अलका यांनी पोस्ट करत लिहिले की, “कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून Dr. Kasturee Athalye. We are very proud of you. Best wishes”. सध्या अलका यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Alka Kubal)

अलका या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. इंस्टाग्राम वरून ते नेहमीच व्यवसायिक आणि
वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्ट शेअर करून प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.
त्यांनी ही गुड न्यूज देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर केली आहे.
तर अलका यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या लेकीचे कौतुक केले आहे.
त्याचबरोबर अलका यांच्या चाहत्यांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अलका यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ते लवकरच ‘आलंय माझ्या राशीला’ या नव्या चित्रपटातून नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
यात निर्मिती सावंत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Web Title :- Alka Kubal | marathi actress alka kubal shares a instagram post stating her daughter success after becoming mbbs doctor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sunil Kedar | सत्यजीत तांबे प्रकरणात नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार का? काँग्रेस नेते स्पष्टचं बोलले; म्हणाले…

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी