सगळेच आरक्षणाची मागणी करणार, मग खुल्या प्रवर्गाबाबत काय? : इम्तियाज जलील

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

राज्यभर मराठा आरक्षणावरून सुरु असलेले आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि लोकांच्या भावनेचा उद्रेक पाहता मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील हे देखील बैठकीस उपस्थित होते. यानंतर जलील म्हणाले, या बैठकीत मराठा आमदार जास्त आहेत म्हणून तुम्ही आरक्षण मागता, धनगर आमदार आहेत ते आरक्षण मागतात, मग मुस्लीम आरक्षणाचे काय, असा प्रश्न आमदार जलील यांनी उपस्थित केला.
[amazon_link asins=’B0756RFBLX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’34a82447-927a-11e8-90e0-db35add02e8f’]
जलील पुढे म्हणाले, दुर्दैवी आहे की ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त त्याच समाजाचा आवाज इथे उठवला जातो. मुस्लीम आरक्षण कोर्टात टिकले होते, मग मुस्लीम आमदार नाही म्हणून हा मुद्दा कोणी उपस्थित करणार नाही का? सगळेच आपल्या समाजासाठी आरक्षणाची मागणी करणार, मग खुल्या प्रवर्गाबाबत काय? त्यांचा कोण विचार करणार? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला.