आलोकनाथ नरकात सडणार : सई ताम्हणकरचा शाप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

१९९० च्या दशकात लोकप्रिय ठरलेली टीव्ही मालिका ताराच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकनाथवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तीव्र राग व्यक्त केला आहे. मराठमोळी सई ताम्हणकर हिनेही ट्विटरवर त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71e2a2e1-cd0c-11e8-97a2-0b36d2242e9e’]

सईने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार, असा एकप्रकारचा शापच तिने आलोकनाथ यांना दिला आहे.

[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79948bf3-cd0c-11e8-a091-077a85184456′]

विनिता नंदा यांनी फेसबुकवर याबद्दलची सविस्तर पोस्ट लिहून आलोकनाथचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. आलोकनाथ यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे बॉलिवूडसह अनेक चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. संस्कारी बाबू अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांनी अशाप्रकारचे कृत्य केले असावे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. मात्र आलोकनाथ यांनी त्यांच्यावर झालेले हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

मी टू हे सोशल मीडियावरील अभियान आता चांगलेच जोर धरू लागले असून दररोज नवनवीन व गंभीर आरोप विविध क्षेत्रातील महिलांकडून केले जात आहेत. दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही अभिनेता सलमान खानबाबत खुलासा केला आहे. तिने कोणताही आरोप सलमानवर केला नसला तरी तो रात्री आपल्या घरी येत होता असे म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने सलमानसोबतच्या आपल्या रिलेशनचा खुलासा केला आहे. सलमान आणि मी केवळ चांगले मित्र असून यापेक्षा जास्त आमच्यात काहीच नसल्याचे तिने स्पष्ट केले. यावेळी सलमानचे शिल्पाच्या वडिलांसोबत असलेले नातेही तिने सांगितले. सलमान रात्री घरी येऊन माझ्या वडिलांसोबत ड्रिंक करायचा असेही तिने म्हटले.

You might also like