Alzheimer’s Disease Causes And Symptoms | सावधान ! अल्झायमर होण्याची ‘ही’ आहेत कारणं, अशा गोष्टींचं सेवन केल्यास आजार गंभीर होऊ शकतो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Alzheimer’s Disease Causes And Symptoms | आरोग्य उत्तम राखण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम घेणे अत्यंत गरजेचे आहे. शारीरिक व्यायाम (Physical Exercise) आपण घेऊ शकतो. परंतु मानसिक व्यायाम (Mental Exercise) आपल्याकडून केला जात नाही. त्याचा परिणाम म्हणून काहींना अल्झायमरसारखा आजार (Alzheimer’s Disease) होतो. पूर्वी हा आजार वृद्ध व्यक्तींमध्ये व्हायचा पण आता सहजपणे चाळिशी उलटलेल्या व्यक्तींमध्येही आढळत आहे. अल्झायमर हा डिमेंशिया आजाराचा एक प्रकार मानला जातो. या विकारांत संज्ञानात्मक क्षमता कमकुवत होतात, परिणामी स्मरणशक्ती कमजोर होणे आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ लागते (Alzheimer’s Disease Causes And Symptoms).

 

अल्झायमर या आजारात मेंदूच्या पेशी कमकुवत होऊ लागतात (Weakening Of Brain Cells). तुमच्या कुटुंबातील कुणाला असा त्रास झाला असेल तर तुम्हीही त्याची काळजी घ्यायला हवी. अल्झायमर हा अनुवांशिक विकार म्हणून ओळखला जातो. या व्यक्तींनी आहाराची विशेष काळजी (Special Diet for Alzheimer’s Disease) घ्यावी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

 

ज्या कुटुंबातील व्यक्तींना पूर्वी म्हणजे साधारण एक ते दोन पिढ्या अगोदर हा आजार झाला असेल तर तो पुढील पिढीत होण्याची भिती असते. अल्झायमर रोगामध्ये गोंधळ, स्मरणशक्तीची समस्या, विचार करण्यात अडचण, दैनंदिन सोपी कामे करण्यात अडचण, चिंताग्रस्तपणा आणि अगदी परिचित व्यक्ती आणि गोष्टी ओळखण्यात अडचण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या रोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत राहणे महत्वाचे आहे (Alzheimer’s Disease Causes And Symptoms).

 

बेकरी पदार्थ आणि मासांहार टाळा (Avoid Bakery Products And Meat) –
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहाराची विशेष भूमिका असते. आपल्याला या आजारांचा अनुवांशिक धोका असेल तर याबद्दल विशेष खबरदारी घेणे अधिक आवश्यक ठरते. संशोधनात असे दिसून आले आहे की प्रक्रिया केलेले आणि संरक्षक पदार्थांचे सेवन केल्याने आपला धोका आणि रोगाची तीव्रता वाढू शकते. अल्झायमरचा धोका टाळण्यासाठी जाम, जेली आणि चीज, ब्रेड आणि प्रक्रिया केलेल्या मांसासह गोठलेले संरक्षक पदार्थ टाळले पाहिजेत.

आहार कसा असावा (How The Diet Should Be) –
अल्झायमरपासून बचाव करण्यासाठी आहार कसा ठेवावा?, याबाबत प्रोसिडिंग्ज ऑफ द न्यूट्रिशन सोसायटीच्या संशोधन पत्राद्वारे काही सूचना करण्यात आल्या आहेत. व्हिटॅमिन -बी आणि फोलेटयुक्त गोष्टींचे सेवन (Vitamin-B And Folate Rich Food) केल्याने वृद्धत्वासह उद्भवणार्‍या मानसिक आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. फोलेट-युक्त आहार संपूर्ण मज्जासंस्था मजबूत आणि निरोगी ठेवून मेंदूची कार्ये सुलभ करण्यास मदत करतात.

 

हिरव्या भाज्यांचे सेवन फायदेशीर (Benefits Of Green Vegetables) –
जे लोक दिवसातून कमीत कमी एक हिरवी भाजी सेवन करतात त्यांना संज्ञानात्मक घट आणि स्मृती कमी होण्याचा धोका (Risk Of Cognitive Decline And Memory Loss) कमी असतो. पालेभाज्यांमधून फोलेट, जीवनसत्त्वे -ए आणि सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स (Folate, Vitamins A And C, Fiber And Antioxidants) भरपूर प्रमाणात मिळतात. हिरवी पालेभाजी खाल्याने दीर्घकाळापर्यंत मेंदूच्या आरोग्यास चालना मिळते. यामधील फोलेटचे प्रमाण निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि मेंदूची कार्ये अधिक चांगल्या प्रकारे राखण्यासाठी उपयुक्त आहे.

 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे (What To Do To Improve Mental Health) ?-
सर्व लोकांनी मानसिक आरोग्याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली, नियमित व्यायाम-योग करा.
लोकांना भेटा, बोला, तुमच्या अडचणी शेअर करा. आहार आणि हायड्रेशनची (Diet And Hydration) विशेष काळजी घ्या.
तुम्हाला आवडणार्‍या गोष्टी करा. तणाव-चिंता व्यवस्थापित करण्यासाठी उपाय करा.

 

कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्याची समस्या जाणवल्यास नि:संकोचपणे तज्ज्ञांचा सल्ला घ्या,
असे न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Alzheimer’s Disease Causes And Symptoms | alzheimer s disease causes and symptoms tips to prevent alzheimer-s problem

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

 

Diabetes Control | जाणून घ्या – शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणते 3 योग आहेत प्रभावी

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ औषध, मुलांमध्ये वाढू शकतो ‘या’ गोष्टीचा धोका