खुशखबर ! ‘अमेझॉन’ देणार माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांना नोकरीची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेझॉन इंडियाने घोषणा केली की, ते माजी सैनिकांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. त्यासंबंधित एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत सैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना देशभरातील अमेझॉनच्या फुलफिलमेंट सेंटर्स, सोर्ट सेंटर्स आणि डिलीवरी सेंटर्सवर नोकरी देण्यात येणार आहे. यामुळे शेकडो माजी सैनिकांना नोकरी करण्याची संधी मिळेल.

डीजीआर आणि एडब्ल्युपीओबरोबर भागीदारी –
अमेझॉन वायस प्रेसिडेंट अखिल सक्सेना यांनी या संबंधित माहिती दिली आहे. त्यांनी माजी सैनिकांना नोकरीची संधी देण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ रिसेटेलमेंट (डीजीआर) आणि आर्मी वेलफेअर प्लेसमेंट ऑर्गनायजेशन बरोबर भागीदारी केली आहे. याच भागीदारीच्या माध्यमातून देशातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांना नोकरीची संधी देण्यात येईल.

अमेझॉन इंडियाने सांगितले की, त्या लोकांच्या सिद्धांतांचा आणि त्याच्या कार्याचा आम्ही सन्मान करतो. त्यांंच्याकडे मोठा विचार, अविष्कार करणे आणि इतर बाबींना सरळ करण्याची उम्मेद असते.

या आधी करण्यात येत होती सैन्याची भरती –
अमेझॉनने सांगितले की, आम्ही डीजीआर आणि एडब्ल्युपीओ बरोबर भागीदारी करुन देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना नोकरीचीय संधी देत असल्याने खूश आहोत. अमेझॉनने सांगितले की, हे प्रयोगिक तत्वावर आहे. भविष्यात नैदल, पायदळ आणि पोलीस सेवा दिलेले अनेक माजी अधिकाऱ्यांना देखील आम्ही संधी देणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –