Coronavirus : चीन सुरूवातीला म्हणाला ‘वॅक्सीन’ तयार, नंतर मारली ‘पल्टी’, नेमकं काय लपवतोय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लंडनमधील चिनी राजदूतांनी एका बैठकीत म्हटले की, त्यांच्या देशाने कोरोना लस तयार केली आहे. पण नंतर चीन यावरून पलटला. एका वृत्तसंस्थेनुसार, चिनी राजदूत लियू शाओमीन्ग यांनी बैठकीत म्हटले होते- ‘आम्ही कोरोना लसीच्या चौथ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहोचलो आहे. आम्हाला ती जगाला उपलब्ध करुन द्यायची आहे.’ चौथ्या चाचणीचा अर्थ असा की लस मोठ्या लोकसंख्येस देण्यासाठी तयार आहे.

नंतर जेव्हा चीनी दूतावासाला या विधानाबद्दल विचारले तेव्हा एक ट्रान्सक्रिप्टची लिंक पाठवली गेली. अहवालानुसार, ट्रान्सक्रिप्ट मध्ये राजदूताचे शब्द बदलून लस ‘दुसर्‍या टप्प्यात’ असण्याबाबत लिहिले गेले.

पण वृत्तसंस्थेनुसार, लियू शाओमीन्ग यांनी बैठकीत इंग्रजीमध्ये भाषण केले होते. ते लस चौथ्या टप्प्यात असल्याबद्दल बोलत असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये ऐकले जाऊ शकते.

काही अहवालामध्ये असे म्हटले जात आहे की, चीनने स्वत:च्याच राजदूताचे भाषण ‘सेन्सर’ केले आहे. तसेच बैठकीत ब्रिटनच्या उद्योग जगतातील आणि औषध कंपन्यांशी संबंधित लोक सहभागी झाले होते, जे राजदूतांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले.

चिनी राजदूत लियू शाओमीन्ग यांनी या बैठकीत सांगितले की, चीन लस उत्पादनाच्या प्रगत अवस्थेत पोहोचला आहे. असे मानले जात आहे की, चीनला पश्चिमी देशांना सध्या हे सांगायचे नाहीये कि ते लस तयार करण्यात इतर देशांपेक्षा पुढे जात आहेत.

मागच्या महिन्यात झालेल्या बैठकीत चिनी राजदूत लियू शाओमीन्ग म्हणाले होते- आमची इच्छा आहे की, लस उपलब्ध व्हावी व ती गरीब आणि कमी विकसित देशांना उपलब्ध व्हावी. आमचा असा विश्वास आहे की, कोविड-१९ ने जगाला जवळ आणले आहे. आम्ही माणुसकीच्या सामान्य भविष्यावर विश्वास ठेवतो.