दुरुस्ती यंत्र बिघाडाने अंबरनाथ-बदलापूर रेल्वे वाहतूक विस्कळीत; रेल्वे मार्ग दुरुस्ती करताना एका कामगाराचा मृत्यु

मुंबई : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे (Ambernath-Badlapur railway) स्थानकाच्या दरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना ट्रॅक मेंटेनन्स करणार्‍या मशीनमध्ये बिघाड झाल्याने स्लीपर्स अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यु झाला. हे मशीन ट्रॅकवर अडकून पडल्याने बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. मशीन हटविण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे.

रेल्वे मार्गाखाली टाकण्यात येणारे स्लीपर्स बदलण्याचे काम पहाटे २ वाजल्यापासून सुरु होते. साधारण पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीनवरील स्लीपर्स अंगावर पडून ३ कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यु झाला. बिघडलेले मशीन रेल्वेमार्गावरच अडकून पडले आहे. हे हटविण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला. याबाबत रेल्वे अधिकारी चौकशी करीत आहेत. या मशीनमध्ये बिघाड झाल्याने स्लीपर्स अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यु झाला. हे मशीन ट्रॅकवर अडकून पडल्याने बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. मशीन हटविण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे.

रेल्वे मार्गाखाली टाकण्यात येणारे स्लीपर्स बदलण्याचे काम पहाटे २ वाजल्यापासून सुरु होते. साधारण पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीनवरील स्लीपर्स अंगावर पडून ३ कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यु झाला़ बिघडलेले मशीन रेल्वेमार्गावरच अडकून पडले आहे. हे हटविण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला़ याबाबत रेल्वे अधिकारी चौकशी करीत आहेत.