प्रशासनाला वेठीस धरणारा ‘तो’ वादग्रस्त मनपा कर्मचारी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माहिती अधिकार अर्जाचा वापर करून अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्रास देणारा कर्मचारी सहाय्यक लेखाधिकारी हाफिजोद्दीन सय्यद राजा यास निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. राजा हा वारंवार वादग्रस्त ठरला आहे.

राजा याने नगरसचिव एस. बी. तडवी यांना अर्वाच्च भाषेत व खालच्या थराला जावून शिविगाळ केली होती. त्यानंतर प्रशासन अधिक आक्रमक झाले होते. त्याच्या खातेनिहाय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. मनपातील वरीष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना खोटे अर्ज देवून त्रास देणे, त्यानंतर खोटा कांगावा करणे, गैरवर्तणुकीबाबत खुलासा मागविल्यावर तक्रारी करणे, माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करुन त्रास देणे असे आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले आहेत. मनपा कामगार युनियननेही राजा याची प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे.

वादग्रस्त कर्मचारी

हाफिजोद्दीन सय्यद राजा हा कर्मचारी महापालिका प्रशासनात आल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. त्याने ज्या विभागात काम केले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. महापालिकेत काम करतानाही पालिका प्रशासनाविरुद्ध कायम विरोधी भूमिकेत राहत होता.