Coronavirus : स्पेनमध्ये एका दिवसात ‘कोरोना’चे 950 बळी, जगभरात 46900 जणांचा मृत्यू, 935000 लोक ‘संक्रमित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्पेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्यांची संख्या 10 हजारांवर गेली आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासात 950 लोकांचा मृत्यू झाला ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा 10,003 वर पोहोचला. स्पेनमध्ये आतापर्यंत संक्रमित लोकांचा आकडा 1,10,000 वर पोहोचला आहे. यासह जगभरात मृतांचा आकडा 46,906 झाला आहे. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 9,35,000 पेक्षा जास्त आहे.

वृत्तानुसार, हा जीवघेणा व्हायरस 200 पेक्षा जास्त देशात आणि बेटांवर पसरला आहे. एकट्या युरोपात 500,000 प्रकरण समोर आली आहेत. अमेरिकेत मास्क, गाऊन आणि हातमोजे या आवश्यक वस्तूंची कमतरता भासू लागली आहे. अमेरिकेत 5 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर 2,10,000 कोरोनाग्रस्त आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, आमचे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यासाठी महत्वपूर्ण आरोग्य सेवा, उपकरणं खरेदी वितरित करण्यासाठी आम्ही विविध संस्थांची मदत घेत आहोत. 11 कंपन्यांनीच्या मदतीने हजारो वेंटिलेटर तयार केले आहेत. या दरम्यान रशियाचे मालवाहू विमान वेंटिलेंटर, मास्क आणि इतर सुरक्षा उपकरणं घेऊन 60 टन आरोग्य उपकरणं घेऊन अमेरिकेत पोहोचले आहे.

या दरम्यान इस्त्राइल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहणारे आरेग्य मंत्री देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री याकोव लित्जमॅन आणि त्यांची पत्नी सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. वृत्तानुसार,देशाची मोसाद गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख देखील वेगवेगळे राहत आहेत. सांगण्यात येत आहे की आरोग्य मंत्री लिज्तमॅन यांच्या संपर्कात आले होते.

इटलीत देखील 13 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. इटलीत कोरोनामुळे 13,115 लोकांचा मृत्यू झाला तर इराणमध्ये 3,160 लोकांचा मृत्यू झाला. इराणमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 50,468 सांगितली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने युरोपात आयसीयूची कमी भासत आहे. चीननंतर आता इटलीच्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा दर देखील कमी होत आहे, परंतु स्पेन आणि फ्रान्समध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

You might also like