US Presidential Election : एका TikTok वापरकर्त्यानं केली ट्रम्प यांची प्रचार रॅली ‘फ्लॉप’, जाणून घ्या कशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरियन पॉप संगीत चाहत्यांनी आणि टिकटॉक वापरकर्त्यांने दावा केला आहे की त्यांच्यामुळेच शनिवारी टुलसा मध्ये आयोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नाही. त्याच्याशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी टिक टॉकवर एक मोहीम राबविली गेली होती. यामध्ये लोकांना रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगण्यात तर आले होते, परंतु रॅलीला उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रॅलीच्या अगोदर ट्रम्पचे निवडणूक प्रचार व्यवस्थापक ब्रॅड पार्स्केल म्हणाले की, 10 लाखाहून अधिक लोकांनी या रॅलीत भाग घेण्यासाठी अर्ज केले होते. तथापि, शनिवारी जेव्हा ट्रम्प बोलण्यासाठी स्टेजवर पोहोचले, तेव्हा 19 हजार आसनांच्या बीओके सेंटर एरीना ची बहुतेक जागा रिक्त होती. टुलसाच्या अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार या रॅलीमध्ये केवळ 6200 लोक उपस्थित होते. रॅलीच्या अगोदर या क्षेत्रात बरीच मोकळी जागा होती, म्हणूनच ट्रम्प यांच्या टीमने बनवलेली ही योजना देखील अयशस्वी ठरली की स्टेडियम भरल्यानंतर राष्ट्रपती बाहेर उभ्या असणाऱ्या लोकांना संबोधित करतील. या घटनेपूर्वी, टिक टॉककडे नृत्य आणि विनोद सादर करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून पाहिले जात असे, परंतु कोणत्याही राजकीय हेतूने कधीही याचा वापर केला गेला नव्हता.

रॅली फ्लॉप होण्यासाठी वापरकर्त्याने टिकटॉक वर टाकला व्हिडिओ
आयोवा येथील 51 वर्षीय महिला मेरी जो लॉप यांनी लोकांना ट्रम्पच्या वेबसाइटवर नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले. लॉप यांनी आपल्या फॉलोअर्सना सांगितले होते की ज्यांना 19,000 आसनांचे सभागृह अर्ध्या रिकामे पाहायचे आहे त्यांनी फक्त नोंदणी करावी. हॅशटॅगटिकटॉकग्रांडमा चा वापर करणारी लॉप ने रॅलीवर बहिष्काराचा व्हिडिओ टाकला असून, त्याला सात लाख लाईक्स मिळाले आहेत. बिडेन यांच्या निवडणूक मोहिमेच्या पथकाने या रॅलीसाठी नोंदणी संबंधित कोणत्याही प्रकारात भाग घेण्यास नकार दिला आहे.

इतिहास केवळ एकदाच ट्रम्प यांना अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवेल
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की इतिहास केवळ एकदाच ट्रम्प यांना अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवेल. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी ट्रम्प यांचे एक तर्कहीन निर्णय घेणारे अध्यक्ष म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की ते वैयक्तिक आणि राजकीय हितसंबंध वेगळे करण्यास असमर्थ ठरले आहेत. ते एक कंझर्व्हेटिव्ह रिपब्लिकन आहेत असं मला वाटत नाही. नोव्हेंबरच्या निवडणुकीत मी त्यांना मतदान करणार नाही. तथापि हे देखील निश्चित आहे की माझे मत जो बिडेन यांनाही जाणार नाही. बोल्टन यांनी ‘द रूम व्हेअर इट हॅपन्ड: ए व्हाइट हाऊस मेमॉयर’ हे पुस्तक लिहिले आहे, जे मंगळवारी प्रदर्शित होईल.