Coronavirus : जगभरात एका दिवसात आल्या 6 लाखांपेक्षा जास्त केस; आतापर्यंत 13 लाख लोकांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    जगभरात कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. मागील 24 तासांत जगभरात 6 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले, तर 9 हजार 593 लोकांचा मृत्यू झाला. तिकडे अमेरिकेत स्थिती बिघडत चालली आहे. तिथे सध्या दररोज सुमारे दीड लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत. ताज्या आकड्यांनुसार, जगभरात आतापर्यंत 5 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत, तर आतापर्यंत सुमारे 13 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

कुठे किती केस?

कोरोना महामारीने सर्वांत जास्त प्रभावित देशात अमेरिका सर्वांत वर आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत दीड लाख नवीन केस आल्या आहेत. यानंतर दुसर्‍या नंबरवर भारत आहे. भारतात 87 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले आहेत, येथे मागील 24 तासांत 43 हजार प्रकरणे वाढली आहेत, तर कोरोनाने तिसर्‍या सर्वांत जास्त प्रभावित देश ब्राझीलमध्ये 24 तासांत 34 हजार प्रकरणे नोंदली गेली. यानंतर फ्रान्स, रशिया आणि नंतर स्पेनचा नंबर येतो.

अमेरिकेत हाहाकार

अमेरिकेत मागील 24 तासांत कोरोनाने 1500पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर देशात आतापर्यंत कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा 2 लाख, 42 हजार, 577 झाला आहे. अमेरिकेत सध्या 38 लाख 11 हजार 931 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर 66 लाख 48 हजार 679 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. अनेक राज्यात वेगाने प्रकरणे वाढत आहेत. अमेरिकेत वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता तयार करण्यात आलेल्या फायझर कोरोना वॅक्सीनला लवकर मंजुरी मिळू शकते.

गुरुवारी भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची 47,905 नवी प्रकरणे समोर आली, ज्यापैकी 78 टक्के प्रकरणे 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून समोर आली आहेत. सर्वांत जास्त 8,593 प्रकरणे दिल्लीत समोर आली आहेत. दुसर्‍या स्थानावर केरळ आणि तिसर्‍या स्थानावर महाराष्ट्र आहे.