काय सांगता ! होय, जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने भारताकडून घेतले 15 लाख कोटींचे कर्ज, प्रत्येक अमेरिकनवर 60 लाखांचे कर्ज

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना महामारीमुळे फक्त भारताला नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. अमेरिका हा देशही आर्थिक अडचणीत सापडला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सुमारे 7 पटींनी जास्त असून, ही 21 ट्रिलियन डॉलर आहे. मात्र, एका रिपोर्टनुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवर 29 ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे 29 लाख कोटी डॉलरचे कर्ज झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळपास 10 टक्क्यांनी जास्त आहे.

अमेरिकेने भारताकडूनही 216 अरब डॉलर सुमारे 15 लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. 2020 मध्ये अमेरिकेवर नॅशनल डेब्ट् 23.4 ट्रिलियन डॉलर होता. या हिशोबाने प्रत्येक अमेरिकन नागरिकावर सुमारे 72309 डॉलर म्हणजेच 52 लाखांपेक्षा जास्त कर्ज होते. पण या रिपोर्टनंतर अमेरिकन नागरिकावर यावेळी सुमारे 84000 डॉलर म्हणजेच 60 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. अमेरिकेच्या काँग्रेस अलेक्स मूनी यांनी सांगितले, की अमेरिकेने सर्वात जास्त चीन आणि जपानकडून कर्ज घेतले आहे. अमेरिकेवर ब्राझीलचेही 258 बिलियन डॉलरचे कर्ज आहे. 2000 मध्ये अमेरिकेवर 6 ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. ओबामा सरकारच्या काळात हे दुप्पट झाले.

भारत घेणार 12 लाख कोटींचे कर्ज
भारताने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 12 लाख कोटींचे कर्ज बाजारातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सरकारचे एकूण कर्ज 147 लाख कोटी रुपये आहे. नव्या आर्थिक वर्षात कर्ज घेण्याच्या घोषणेनंतर हा आकडा 159 लाख कोटींवर होऊ शकतो. तसेच चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज आहे.