आयुष्मानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटाचे डोनाल्ड ट्रंप यांनी केलं ‘कौतूक’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार स्टारर रोमँटिक कॉमेडी गे फिल्म शुभ मंगल ज्यादा सावधान रिलीज झाली आहे. या फिल्मला प्रेक्षकांकडून पॉझिटीव्ह रिस्पॉन्स मिळत आहे, सोबतच ही फिल्म आपल्या संवेदनशील विषयामुळे इंटरनॅशनल स्तरावरसुद्धा चर्चेचा विषय झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या फिल्मचे कौतूक केले आहे.

ब्रिटिश अ‍ॅक्टिविस्ट पीटर गॅरी टॅचेल यांनी शुभ मंगल ज्यादा सावधान संबंधी एक ट्विट शेयर केल आहे. त्यांनी लिहिले आहे की, एक रोमॅटिक कॉमेडी रिलीज झाली आहे. भारतात समलैंगिकता वैध केल्यानंतर आता या फिल्मच्या मदतीने देशातील ज्येष्ठ लोकांना समलैंगिकतेबाबत जागरुक आणि जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पीटर यांचे हे ट्विट ट्रम्प यांनीही रिट्विट केले आणि एका शब्दात यास ग्रेट म्हटले. यानंतर पीटर यांनी ट्रम्प यांचे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, मी आशा करतो की, ही प्रेसिडेन्ट ट्रम्प यांचे एलजीबीटीचे मुद्दे गांभिर्याने घेण्याची सुरूवात आहे आणि आशा करतो की, हा कोणताही पीआर स्टंट नाही.

पीटर गॅरी टॅचेल ब्रिटिश ह्यूमन राईट्सचे कम्पेनर आहेत. ते मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत. ते एलजीबीटी समुदायासाठी सोशल मूव्हमेंट्समध्ये केलेल्या त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांना 1981 मध्ये प्रथम बार लेबर पार्टीने आपला उमेदवार म्हणून निवडले होते. आयुष्मान खुरानाची फिल्म शुभ मंगल ज्यादा सावधान छोट्या शहरातील गे रिलेशनशिप्सशी संबंधित अडचणींना विनोदी प्रकारे दाखवते.

बॉलीवुडमध्ये यापूर्वी अनेकदा समलैंगिक संबंध दाखवण्यात आले आहेत, परंतु बहुतांश फिल्ममध्ये एकतर हे अतिशय हळूवार आणि विनोदी अंगाने स्टीरियोटाइप दाखवले गेले. तर फायर, अलीगढ सारख्या फिल्ममध्ये एखाद्या समलैंगिक व्यक्तीचे जीवन खुपच गांभिर्याने दाखवले गेले.

आयुष्मानची ही फिल्म यासाठी वेगळी आहे की, ती केवळ गे रिलेशनशिप्सला छोट्या शहरात सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करते. तसेच याबाबत समाजात असलेल्या गैरसमजांना अतिशय विनोदी प्रकारे दाखवण्यात आले आहे. या फिल्ममध्ये आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमारशिवाय नीना गुप्ता, गजराज राव सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.