Covid-19 : अमेरिकन सिनेटर्सची राष्ट्राध्यक्षांकडे मागणी, ‘कोरोना’ व्हायरस उत्पत्तीची आंतरराष्ट्रीय तपासणी व्हावी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   अमेरिकन सिनेटर्सच्या शक्तिशाली गटाने कोरोना विषाणूचे उद्दीष्ट शोधण्यासाठी जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांसारख्या भागीदारांशी खुली व पारदर्शक आंतरराष्ट्रीय तपास करण्याची मागणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) या संकटाबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सेनेटर्सनी राष्ट्रपतींना उच्चस्तरीय दूत नेमण्याचीही केली विनंती

फ्लोरिडा येथील रिपब्लिकन सिनेटर मार्को रुबिओ यांच्या नेतृत्वात सिनेटर्सनी राष्ट्रपतींना उच्चस्तरीय दूत नेमण्याची विनंती केली. जे कोविड -१९ ला सामोरे जाण्यासाठी आणि त्या संबंधित चौकशीच्या आंतरराष्ट्रीय समन्वय प्रयत्नांचे नेतृत्व करतील. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर सिनेटर्समध्ये मार्शा ब्लॅकबर्न, थॉमस टिलिस, जॉन कॉर्निन, रॉजर विकर, टेड क्रूझ, डॅन सुलिव्हान आणि माईक ली यांचा समावेश आहे.

चीनने वुहानमध्ये कोविड -१९ रोग लपविण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेचा आरोप

सिनेटर्सनी आरोप केला आहे कि, वुहानमध्ये कोविड – १९ या रोगाच्या सुरुवातीपासूनच चीनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) याला लपविण्याचा, यावरून लक्ष वळविण्याचा आणि त्यासाठी थेट अमेरिकेला दोष देण्याचा प्रयत्न केला. एकदा साथीच्या आजारावर नियंत्रण आल्यानंतर, व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल आणि चीनने डब्ल्यूएचओसह आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कथित गैरवापरांबद्दल तपशीलवार आंतरराष्ट्रीय तपासणी करणे आवश्यक असल्याचेही म्हंटले आहे. तसेच महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांत घेण्यात आलेल्या डब्ल्यूएचओच्या निर्णयाचाही तपासात समावेश असावा. यात व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी चीनकडून दबाव आणणे आणि तैवानशी त्याचे व्यवहार यांचा समावेश आहे.

अमेरिकेला दोष देण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आणि अपमानजनक

सिनेटर्सच्या म्हणण्यानुसार, चीनकडून व्यत्यय आणणे आणि लक्ष दुसरीकडे वळविणे हे जागतिक सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष आणि अनादर करण्यासारखे आहे. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्यदलासह अमेरिकेला दोषी ठरविण्याचा त्यांचा प्रयत्न आणि राजकीय अनुपालनाच्या अटीवर वैद्यकीय सहाय्याविषयी बोलणे हास्यास्पद आणि अपमानास्पद होते. सिनेटर्सने पुढे म्हंटले कि, अश्या सत्तेच्या कारवाईवर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही जो दहा लाखाहून अधिक उइगुर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याकांना ताब्यात घेतो, एक असा देश जो हाँगकाँगच्या स्वायत्ततेच्या आश्वासनापासून मागे हटतो, आणि जो पत्रकारांना एकतर तुरुंगात टाकतो किंवा त्यांना हद्दपार करतो.

सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे सदस्य टेड क्रूझ यांनी व्हिसिल ब्लोअर प्रतिबंधित करण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात माहिती लपवण्यास जबाबदार असलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर बंदी घालण्याचे विधेयकदेखील मांडले आहे.