अमेरिकेची मोठी घोषणा ; लादेनच्या मुलाची माहिती देणाऱ्यास अमेरिका देणार १० लाख डॉलर

न्युयॉर्क : पोलीसनामा ऑनलाईन – अल् कायदाचा म्होरक्या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने समोर आणली आहे. म्हणून अमेरिकेने लादेनच्या मुलावर १० लाख डॉलरचे बक्षीस लावले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी या बक्षिसाची घोषणा केली आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हा आपल्या वडिलाच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. तशी त्याने धमकी अमेरिकेला दिली आहे. अमेरिका तसेच अमेरिकेच्या जवळच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करण्याच्या तयारीत लादेनचा मुलगा असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने म्हणले आहे. त्याच आधारावर अमेरिका लादेनच्या मुलाचा खात्मा करण्याची रणनीती आखत आहे.

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बद्दल आणखीन एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे त्याने वल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्लाची सूत्रे सांभाळणाऱ्या मोहम्मद अट्‍टाच्या मुली सोबत लग्न केले आहे. तसेच हमजाला अल् कायदा दहशतवादी संघटनेत वरचे पद मिळाल्याने तो आपल्या वडिलाच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत आहे अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने समोर आणली आहे.