‘कोरोना’च्या उपचारात ‘डेक्सामेथासोन’ परिणामकारक, एस्ट्राजेनेकाची घटना एक ’वेक-अप कॉल’ : WHO

संयुक्त राष्ट्र : जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी गुरूवारी म्हटले की, कोरोना संसर्गाच्या उपचारात डेक्सामेथासोन औषध अत्यंत परिणामकारक ठरत आहे. ते म्हणाले, डेक्सामेथासोन गंभीर आणि क्रिटिकल कोरोना रूग्णांसाठी प्रभावी ठरले आहे. इतर अनेक औषधे सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. जगभरात सुमारे 180 कोरोना वॅक्सीनवर काम सुरू आहे. यापैकी 35 वॅक्सीन मानवी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

तर डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले की, एस्ट्राजेनेका वॅक्सीनच्या ट्रायलमध्ये आजाराचे येणे एक ’वेक-अप कॉल’ प्रमाणे आहे. परंतु यामुळे शास्त्रज्ञांनी निराश होण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या उपचारात चढ-उतारासाठी आपल्याला पूर्णपणे तयार राहिले पाहिजे. या घटनाक्रमाने आम्ही नाराज नाही. अशा घटना होत असतात. महामारी नष्ट करण्यासाठी अनेक देश आतूरतेने वाट पहात आहेत.

तर डब्ल्यूएचओचे आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी म्हटले की, ही व्हायरसविरूद्ध आणि जीवन वाचवण्याची रेस आहे. ही रेस देशांमध्ये एकमेकांना मागे टाकण्यासाठी नाही. व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये डब्ल्यूएचओच्या अधिकार्‍यांनी म्हटले, विविध देशांमध्ये गरीब लोकांना लस उपलब्ध करण्यासाठी अंतरराष्ट्रीय दात्यांकडून मिळालेले दान 700 मिलियन डॉलरची रक्कम अपेक्षेपेक्षा निम्म्याने कमी आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याची लस केवळ श्रीमंत देशांपुरतीच मर्यादित राहू नये, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दोन अरब डॉलर जमवण्याचे लक्ष्य आहे. तर संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी पुढील तीन महिन्यात 35 अरब डॉलर आणखी जमवण्याचे आवाहन केले आहे. ही रक्कम कोरोना नष्ट करण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमासाठी जमवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, आतापर्यंत यासाठी सुमारे तीन अरब डॉलरच्या रक्कमेचे योगदान देण्यात आले आहे.