Job Alert ! भारतातील टेक सेक्टरमध्ये 4 हजार पदे भरणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट भीषण आहे. याचा फटका उच्चभ्रूपासून ते सर्वसामान्य वर्गालाही बसला आहे. नोकरवर्गाला तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहींना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत. पण आता अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) या वर्षी भारतात हजारो पदे भरण्याच्या तयारीत आहे.

जेपी मॉर्गन या कंपनी या वर्षी भारतात हजारो लोकांना नोकरी देण्याची तयारी केली आहे. त्याबाबत कंपनीने म्हटले, की ‘भारतात यावर्षी सुमारे 4 हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टला नोकरीची संधी दिली जाणार आहे. एचआर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख गौरव अहलुवालिया यांनी सांगितले की, ‘टेक्नोलॉजी आमचे ग्राहक यशस्वी आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जेपी मॉर्गनमध्ये सध्या 2.5 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. यामध्ये 35 हजार कर्मचारी एकट्या भारतात कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादेत सुरू असलेल्या टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटरमध्ये काम करत आहेत. हे सेंटर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ऑपरेशनला सपोर्ट करते.

दरम्यान, जेपी मॉर्गन चेसने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी 20 लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. बंगळुरूमधील टेक सेंटरसाठी कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त भरती केली जाणार आहे. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी सांगितले की, बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी 2 मिलियन देण्याची घोषणा केली आहे.