सीमेवरील तणावा दरम्यान चीननं भारताला दिलं 5714 कोटी रूपयांचं कर्ज, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या दरम्यान सीमेवर तणाव कायम आहे. हा तणाव असतानाही चीनने भारताला हजारो करोड रूपयांचे कर्ज दिले आहे. बिजिंगयेथील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताच्या 75 करोड डॉलर (सुमारे 5,714 करोड रूपये) च्या कर्जाला मंजूरी दिली आहे. हे कर्ज सरकारला गरीब आणि कमजोर कुटुंबांसाठी कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देण्यात आले आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) च्या सहकार्याने देण्यात येणारे कर्ज अनौपचारिक सेक्टरसह व्यवसायांची मदत, गरजूंची सामाजिक सुरक्षा वाढविणे आणि देशाची हेल्थ केयर सिस्टम मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे.

एआयआयबीने म्हटले आहे की, आर्थिकमंदीमुळे गरीब कुटुंबावर परिणाम होण्याची शक्यता आहे, विशेषता महिला ज्या अनेक अनौपचारिक क्षेत्रात काम करत आहेत. एआयआयबीचे उपाध्यक्ष, गुंतवणूक संचालक, डीजे पांडियन यांच्यानुसार जगातील अनेक कमी आणि मध्यम उत्पन्न असणारे देश अजूनसुद्धा आरोग्य संकटाच्या पहिल्या टप्प्यात आहेत, परंतु या महामारीचा प्रभाव पहिल्यापासून अनुभवत आहोत. यामुळे भारतातील त्या लाखो लोकांनाही धोका आहे, जे काही काळापूर्वीच गरीबीतून बाहेर आले आहेत.

एआयआयबीने भारताच्या एकुण 3.06 अरब डॉलरच्या कर्जाला मंजूरी दिली आहे. यामध्ये नुकत्याच दिलेल्या 50 करोड डॉलरच्या कोरोना व्हायरस इमर्जन्सी रिस्पॉन्स रक्कमेचा समावेश आहे. सध्याचे लोन एआयआयबीच्या कोविड-19 संकट रिकव्हरी सुविधेंतर्गत भारतासाठी दुसरे आर्थिक सहाय्य असेल. यादरम्यान भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. बुधवारी समोर आलेल्या आकड्यानुसार रूग्णांची संख्या वाढून 3.50 लाखपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सुमारे 12,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे चीनी परराष्ट्र मंत्रालयाचा संदर्भ देऊन रॉयटर्सने म्हटले की, चीनने भारतासोबत सीमा वादाचा मुद्दा निष्पक्ष पद्धतीने सोडवणार असल्याचे जाहीर केले आहे.