‘सिक्सर किंग’ युवराजची Ex गर्लफ्रेंड किम शर्माला डेट करतोय अमित साध ? अभिनेत्यानं सोडलं मौन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस किम शर्मा (Kim Sharma) गेल्या अनेक महिन्यांपासन सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. परंतु तिचे चाहते तिला सोशलवर फॉलो करतात. तीदेखील चाहत्यांसाठी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशलवर शेअर करत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. आपल्या हॉटनेसमुळं कायम चर्चेत असणारी किम शर्मा आता डेटिंगच्या बातम्यांमुळं चर्चेत आली आहे.

अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, किम तिच्या आई वडिलांसह अभिनेता अमित साध (Amit Sadh) सोबत डिनर केलं आहे. यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चेच्या बातम्या समोर आल्या आहेत. इतकंच नाही तर ते गोव्यात स्पॉट झाले होते. यावर आता अमित साधनं प्रतिक्रिया दिली आहे.

अमित साध म्हणाला की, अशा चर्चांनी मला काही फरक पडत नाही. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, आम्ही रेस्टॉरंटमध्ये अचानक एकमेकांच्या समोर आलो. यावेळी आम्ही एकमेकांना ग्रीट केलं. बस एवढंच आहे.

डिनरची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी दोघांच्या अफेअरबद्दलही बोललं आहे. यावर अलीकडेच किमनं भाष्य करत याबबात खुलासा केला आहे. ती अमितला डेट करत नसल्याचं तिनं सांगितलं आहे. किमनं हेही सांगितलं की, ही त्यांची पहिली भेट होती. अमित साधनंही सांगितलं होतं की, तोदेखील सध्या सिंगल आहे.

किमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर मोहब्बते या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

अमितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटचा तो विद्या बालनच्या शकुंतला देवी सिनेमात दिसला होता. अलीकडेच अमित ब्रीद- इंटू द शॅडो या वेब सीरिजमध्ये दिसला. यात अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत होता. याशिवाय त्यानं अवरोध : द सीज विदईन मध्येही काम केलं आहे. क्यु होता है प्यार या मालिकेतून त्यानं करिअरला सुरुवात केली होती. 2010 साली आलेल्या राम गोपाल वर्मा यांच्या फूंक 2 या सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्यानं काय पो छे, गुड्डू रंगीला, सुलतान, सरकार 3, गोल्ड अशा अनेक सिनेमात काम केलं.

You might also like